Uncategorized

कुंडलवाडी शहरात कत्तल करण्यासाठी ठेवलेले दोन बैल पकडले… कुंडलवाडी पोलिसांची कामगिरी

New Bharat Times नेटवर्क

कुंडलवाडी :- शहरात कुंडलवाडी पोलिसांतर्फे अवैध धंद्यावर धाडसत्र सुरूच असून आज दि.९ ऑगस्ट रोजी कतली साठी जाणारे दोन बैल कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक मस्के व कर्मचाऱ्यांनी पकडून जीवनदान दिले आहे.

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाजी पाटील यांनी बैठकी मध्ये अवैध धंद्यावर कारवाईचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यात अवैध धंद्यावर पोलिसांकडून धाडसत्र सुरू असून गत ८ दिवसात कुंडलवाडी पोलिसांकडून अवैध धंद्यावर सतत कारवाया सुरू असून ८ दिवसात अवैध दारू व शिंदी विक्री करणाऱ्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तसेच जनावरांच्या हाडांच्या मासाची अवैध वाहतूक होत असताना वाहन पकडण्यात आले. यातच आज ९ ऑगस्ट रोजी पहाटे शहरातील मुनवर मशीद भागातील बाभुळाच्या झाडाखाली कत्तलीसाठी नेणारे दोन बैल बांधण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात दोन्ही बैल ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. कत्तलीसाठी जाणाऱ्या दोन्ही बैलांना कुंडलवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन जीवनदान दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

कुंडलवाडी पोलिसांकडून अवैध धंद्यावर गय ८ दिवसापासून धाडसत्र करून सतत कारवाया सुरू असून आज दि.९ ऑगस्ट रोजी पहाटे मुनवर मशीद जवळ कत्तलीसाठी नेण्यात येणारे दोन बैल बाभुळाच्या झाडाखाली बांधून ठेवल्याची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी जात दोन बैल ताब्यात घेण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

दोन्ही बैलांना गोशाळेमध्ये देण्यात येणार आहे. कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यावर यापुढेही कारवाया सुरूच असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक दीपक मस्के यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker