कुंडलवाडी ते नागणी रोडवर पोलिसांनी गुटखा पकडला ◆५५ हजार ९९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त
◆दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक ◆दोन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी

कुंडलवाडी :- शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मोटारसायकल वरून तेलगंणा राज्यातून नागणी मार्गे कुंडलवाडी कडे येत असताना कुंडलवाडी पाेलिसांनी पथकाने पकडले असून मोटारसायकल सह ५५ हजार ९९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.ही कारवाई दि.९ सप्टेंबर रोजी सांयकाळी ६:३० वाजता केली.दोन्ही आरोपींना धर्माबाद येथील न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती कुंडलवाडी पोलिसांनी दिली आहे.
कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे व पोहेकाँ मिलिंद नरबाग व पोकाँ अमर शिंदे हे अवैध धंद्यावर कारवाई करणे कामी दि.९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता कुंडलवाडी ते नागणी रोडवर पेट्रोलिंग करीत असताना लगतच्या तेलंगणा राज्यातून नागणी मार्गे कुंडलवाडीकडे येत असलेली हिरो स्पेल्डंर मोटरसायकल क्रमांक एम.एच. २६ सीडी ९५६१ यास थांबवून तपासणी केली.
यात मानवी आरोग्यास हानिकारक असलेला शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित पान मसाला, सुगंधित गुटखा, तंबाखुजन्य पदार्थ तसेच मोटारसायकल असा एकुण ५५ हजार ९९४ रुपयांचा जप्त केला असून पोकाँ अमर शिंदे यांच्या तक्रारीवरून आरोपी साहेबराव गंगाधर नरवाडे (रा. कांगठी ता.बिलोली) व दत्तराम पांडुरंग नरवाडे( रा.कांगठी ता.बिलोली) या दोन जणांविरुद्ध गुरनं १४१/२०२४ कलम १२३, २७४, २७५ ३(५) महाराष्ट्र राज्य प्रतिबंधक कायद्यान्वये व भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना कुंडलवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार,भोकर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, धर्माबाद उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपत्ते,सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, पोहेकाँ मिलिंद नरबाग व पोकाँ अमर शिंदे यांनी केली आहे.