बिलोली देगलूर विधानसभेत गोविंद हणवटे यांची मतदारसंघात मतदारातुन वाढती लोकप्रियता
मोरे मनोहर
किनाळा :- बिलोली देगलूर राखीव विधानसभा मतदारसंघात मतदार संघातील मतदारात सामान्य कुटुंबातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे युवा कार्यकर्ते गोविंद हनवटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मतदार संघात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात असलेली लोकप्रियता पाहता त्यांच्या कार्याची नोंद घेऊन येणाऱ्या विधानसभेत काँग्रेस पक्षाने संधी द्यावे असे सुज्ञ मतदारांनी आपल्या भावना व्यक्त केले.
गोविंद हणवटे यांच्या सामाजीक कार्याचा विचार केल्यास त्यांनी सर्व जाती धर्मातील गोरगरिबांचे स्वराज्य युथ फाउंडेशनच्या माध्यमातून आपण एक माणुसकीच्या नात्याने काहीतरी देणं लागतो म्हणून गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून विविध जाती धर्मातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत म्हणून शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतले.त्यांच्या स्वराज्य युथ फाउंडेशनने नांदेड आणि लातूर अशा जिल्ह्यात”झाडे लावा झाडे जगवा” अभियान असो, किंवा सुशिक्षित बेरोजगार मुलांसाठी वेगवेगळे प्रशिक्षण शिबिर असो, शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप असो किंवा एखाद्या पीडित कुटुंबाला वयक्तिगत मदत असोअशा विविध क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले.
शंकरनगर येथे बाहेरगाऊन शिक्षण घेण्यासाठी येतअसलेल्या मुलींना थांबण्यासाठी असलेल्या बस स्थानकाची दुरावस्था पाहून गोविंद हनवटे यांच्या नेतृत्वाखाली गोदावरी मनारच्या जागेमधली कॅन्टींगची टीन पत्र दुरुस्ती करून रंगरंगोटी करून भिंतीवर चित्र व रांगोळी काढून त्या बसस्थानकासमोर झाडे लावून त्याच जागेला सुंदर सजविण्यात आले अशा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती मतदार संघाचा लोक प्रतिनिधी म्हणून निवडल्यास मतदार संघाचा नक्कीच विकास होईल असा आशावाद अनेकांना आहे.
आज पर्यंत कोणत्याही इच्छुक लोकप्रतिनिधींनी जी काम केले नाहीत असे अनेक समाज उपयोगी कामे सामाजिक क्षेत्रात काम करणारे श्री गोविंदराव हनवटे यांनी केले. असून अशा निस्वार्थ व काम करण्याची आवड असलेल्या कार्यकर्त्यांना राखीव असलेल्या देगलूर बिलोली विधानसभेत काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावे असे हनवटे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व समाजातील सुज्ञ मतदार बांधवातून केले जात आहे. शंकरनगर तालुका बिलोली येथे मुस्लिम समाज बांधवांचा वतीने पठाण ग्रुपचे अध्यक्ष अमजद पठाण यांच्या नेतृत्वाखाली ली अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला रात्रीचे अकरा वाजता मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
28 सप्टेंबर रोजी गोविंद हनवटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त बिलोली देगलूर विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत मतदार संघातील विविध गावात अभिष्टचिंतन सोहळ्याचेआयोजन मतदारांनी केले होते त्यांच्या या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अनेक मतदारांनी गोविंद हणवटे यांना विधानसभेचे उमेदवारी मिळाली पाहिजे अशा भावना व्यक्त करताना उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढवावे आम्ही तुमच्या सोबत राहू असाही विश्वास अनेकांनी बोलून दाखवले.