पंचवीस दिवसानंतरही अतिवृष्टीचू पंचनामे होईनात : कुंटूर मंडळातील शेतकरी संतप्त
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : तालुक्यातील कुंटूर मंडळात दि. २ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले शेतकऱ्यांनी विमा कंपणीकडे तातडीने आँनलाईन तक्रारही नोंदवली आहे. मात्र मागच्या पंचवीस दिवसापासून ना विमा कंपणीचे अधिकारी आले ना महसूलचे कर्मचारी. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी दि.२७ रोजी तहसीलदारांना निवेदन देवून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या असून. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली २५ टक्के अग्रीमची अधिसूचना रद्द करुन वैयक्तिक दाव्यानुसार नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सप्टेंबर महिण्याच्या सुरुवातीला अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले गोदावरी नदीच्या बँकवाटरमुळे शेतीचे तळे झाले होते. त्यामुळे अतोनात नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्याचे धोरण ठरले होते. कुंटूर मंडळात दि.२ सप्टेंबर २०२४ रोजी अतिवृष्टी झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने विमा कंपणीकडे आँनलाईन तक्रार नोंदवली दुसरीकडे अतिवृष्टी आणि गोदावरी नदीच्या बँकवाटरमुळे नुकसान झालेल्या शेतीचे संयुक्त पंचनामे करण्याच्या तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार पंचनामा करण्यासाठी पथकेही नियुक्त झाले. मात्र आजपर्यंत कुंटूर परिसरातील शेतीचे पंचनामे करण्यासाठी ना विमा कंपणीचे कर्मचारी आले ना महसूल विभागाचे.
अतिवृष्टीच्या २५ दिवसानंतरही कुंटूर परिसरातील पंचनामे झाले नसल्याने या भागातील शेतकऱ्यांनी मारोतराव कुंटूरकर यांच्या नेतृत्वाखाली दि. २७ रोजी तहसीलदारांची भेट घेण्यासाठी गेले होते पण तहसीलदार उपस्थित नसल्याने नायब तहसीलदार संजय देवराये यांची भेट घेवून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी शेतकऱ्यांनी एक निवेदन दिले असून त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली २५ टक्के अग्रीमची अधिसुचना ही पुरग्रस्त शेतकऱ्यावर अन्याय करणारी असल्याने रद्द करून वैयक्तीक दाव्यानुसार नुकसानग्रस्तांचा पंचनामा करण्यात यावा आणि विमा मंजूर करण्यात यावा, मौजे कुंटूर येथील गोदावरी नदीच्या ब्याकवाटरमुळे पुरबाधित क्षेत्रासाठी विशेष निधीची तरतूद करुन सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकाची नुकसानभरपाई एस डी आर एफ च्या निकषाच्या पाचपट वाढीव दराने देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
नायगाव तालुक्यात दरवर्षी होणाऱ्या अतिवृष्टीमुळे आणि गोदावरी नदीच्या ब्याकवाटरमुळे कुंटूर येथील शेती पुराने मोठया प्रमाणात बाधित होत आहे. हा प्रश्न दरवर्षीचाच आहे. तरी आपण शासनस्तरावर कुंटूर येथील बाधित क्षेत्रासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात यावी, शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत करण्यात येत असताना २ हेक्टर व ३ हेक्टरची मर्यादा रद्द करुन शेतकऱ्यांच्या नावे असलेल्या पुर्ण जमिनीची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
यावेळी उपसरपंच शिवाजी पा होळकर, माजी पंचायत समिती सदस्य सूर्यकांत पा कदम, मारोतराव पा. कदम कुंटूरकर, संतोष महाराज, बालाजी पा कदम, मोहनराव महादाळे, मारोती नाइकवाडे, विनायक बकवाड, राजेश कदम, गजानन राचेवाड, हणमंत आडकीने, अफरोज चौधरी, अफरोज गुज्जीवाले, बालाजी देवघरे, व्यंकट धामणगावे, निलेश कुंचमवाड, जहीर शेख, मारोती पा होळकर, मनान, पांडुरंग कदम, गजानन टेंम्बरे, प्रशांत पा पुयड, गणेश पा पुयड, माधवराव पा शिळे, सोनटक्के, संभाजी पा होळकर व कुंटूर गावातील व ईकळीमाळ येथील शेतकरी उपस्थित होते.