ताज्या बातम्यानांदेडनायगांव

जनतेच्या आशीर्वादावरच बिलोली देगलूर हि विधानसभा निवडणुक लढवणार – गोंविद हनवटे

मोरे मनोहर

किनाळा :- कै.शंकररावजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माझे वडील ज्ञानोबा हनवटे हे काँग्रेस पक्षात सक्रिय कार्य केले त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी ही आज पर्यंत भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात काम करत असताना स्वराज्य युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून गेली दहा ते पंधरा वर्षांपासून जे सामाजिक कार्य केले आहे.

त्याच कार्याची आज पोच पावती म्हणून बिलोली देगलूर राखीव विधानसभा मतदारसंघात मतदार संघातील बौद्ध समाज, मुस्लिम समाज, मराठा समाज याचबरोबर विविध समाजातील कार्यकर्ते व सामान्य जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे असल्यामुळे ही विधानसभा मतदाराच्या आग्रहामुळे काँग्रेस पक्षाकडून मी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असल्याचे गोविंद हनवटे यांनी सांगितले.

गोविंद हणवटे हे एक उच्च विद्या विभूषित असून ते आज पुणे पिंपरी चिंचवड येथे इंजिनीयर म्हणून कार्यरत आहेत. परंतु त्यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असल्याने हे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून स्वराज्य युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष म्हणून काम करताना या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण एक माणुसकीच्या नात्याने काहीतरी देणं लागतो हा दूरदृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून विविध जाती धर्मातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत म्हणून शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतले.

सुशिक्षित बेरोजगार मुलांसाठी वेगवेगळे प्रशिक्षण शिबिर असो, शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप असो किंवा एखाद्या पीडित कुटुंबाला व्यक्तिगत आर्थिक मदत असो,अनेकांच्या मुलींच्या विवाहासाठी केलेली मदत कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता केलेले कार्य असल्याने याच कार्याची नोंद घेऊन आज मतदारसंघातील सामान्य जनता ही निवडणूक मि लढवली पाहिजे असा आग्रह अनेकांनी धरला आहे.

बिलोली देगलूर राखीव असलेल्या या विधानसभा मतदारसंघात आज पर्यंत जे आमदार झाले त्यांनी या मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास केला नाही, मतदार संघातील सामान्य जनतेचे काय प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी काय केले पाहिजे याची प्लॅनिंग आजपर्यंतच्या उमेदवारांनी करायला पाहिजे होती पण ती केली नसल्याने या मतदारसंघाचा विकास झालेला नसल्यामुळे मी या मतदारसंघाचा विकासासाठी प्लॅनिंग कशी करावी याची मला योग्य माहिती असल्याने मी मतदार संघाच्या विकासासाठी ह्या निवडणुकीच्या मैदानात जनतेच्या आशीर्वादावर उतरणार असल्याचे सांगितले.

बिलोली देगलूर राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघात कै.शंकररावजी चव्हाण यांच्या कार्यकाळापासून ते आज भाकर पाटील खतगावकर यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ राहून कार्य करत असताना जनतेच्या आग्रहास्तव पक्षाकडून मला ही निवडणूक लढवण्याची संधी द्यावी यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, अमित भैया देशमुख, माजी खासदार भास्करपाटील खतगावकर , काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यासह पक्षाच्या वरिष्ठांकडे भेट घेऊन माझ्या उमेदवारी बाबत उमेदवारी द्यावे यासाठी मी पक्षाकडे रीतसर मागणी केलेली असुन मला राखीव असलेल्या मतदारसंघात सर्व समाजातील मतदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले.

आज पर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी जी काम केले नाहीत असे अनेक समाज उपयोगी कामे सामाजिक क्षेत्रात काम करणारे श्री गोविंदराव हनवटे यांनी केले. असून अशा निस्वार्थ व काम करण्याची आवड असलेल्या कार्यकर्त्यांना राखीव असलेल्या देगलूर बिलोली विधानसभेत काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावे असे हनवटे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व समाजातील सुज्ञ मतदारांनी गोविंद हणवटे यांना विधानसभेचे उमेदवारी मिळाली पाहिजे अशा भावना व्यक्त करताना उमेदवारी न दिल्यास अपक्ष निवडणूक लढवावे आम्ही तुमच्या सोबत राहू असाही विश्वास अनेकांनी बोलून दाखवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker