नायगाव : मंगळवेढा हे महात्मा बसवण्णाची कर्मभूमी आहे ; जिथे एक दशकापेक्षा जास्त काळ महात्मा बसवण्णा तिथे राहिले. मागील दहा वर्ष सत्तेत असणारा भाजप स्मारकाचा निधी घोषित करून स्मारक उभारू शकले नाही. अशा लोकांना मंगळवेढ्याच्या पवित्र भूमिला वंदन करण्याचा कुठलाही अधिकार नाही. निवडणुकीच्या तोंडावर भाजपने बेगडी प्रेम दाखवू नये असा खळबळजनक आरोप करुन निळंकठ ताकबीडकर यांनी फेसबुकवर खरमरीत व सडेतोड मत व्यक्त केल आहे. त्यांच्या या फेसबुक पोस्टची जोरदार चर्चा होत आहे.
निळकंठ ताकबीडकर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर जे लिहीलय ते न्यु भारत टाइम्सने वाचकासाठी उपलब्ध करुन देत आहे. ते आपल्या पोस्टमध्ये कुणाचे नाव घेतले नसले तरी खा. अजित गोपछडे यांना उद्देशून लिहीलय असा अर्थ काढल्या छात आहे. ते अस म्हणतात की, लिंगायत समाजासाठी भारतीय जनता पक्षाने मागील दहा वर्ष सत्तेत असताना काहीच न करता आता भलतेच प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करू नये. केवळ लोकसभेत झालेला पराभव आणि दुरावलेले लिंगायत मतदार पाहून भाजपाची झोप उडालेली आहे म्हणून ते काही पक्षाशी प्रामाणिक असणारे पण समाजात काहीच योगदान नसणारे लिंगायतद्रोही महाशयांना पुढे करू पोळी भाजण्याचा प्रयत्न भाजपवाले करत आहेत.
मंगळवेढा येथे सभा घेत असताना भाजपवाल्यांनी आणि लिंगायत समाजाचा इतिहास माहीत नसणाऱ्या अकलेचे तारे तोडणाऱ्या भाजपा खासदारांनी सर्वप्रथम आत्मपरीक्षण करावे. मंगळवेढा हे महात्मा बसवण्णाची कर्मभूमी आहे ; जिथे एक दशकापेक्षा जास्त काळ महात्मा बसवण्णा तिथे राहिले आणि मागील दहा वर्ष सत्तेत असणारा भाजप स्मारकाचा निधी घोषित करून स्मारक उभारू शकले नाही. अशा लोकांना मंगळवेढ्याचा पवित्र भूमिला वंदन करण्याचा कुठलाही अधिकार नाही.
विधानसभेला पराभव डोळ्यासमोर दिसतो आहे म्हणून समतानायक महात्मा बसवण्णाच्या नावाने महामंडळ स्थापन केले गेले जसे की आता कित्येक महामंडळ घोषित केले गेले ज्यातून कुठल्याच प्रकारचा लाभ सामान्य लिंगायत माणसाला आजतागायत झालेला नाही. हा केवळ निवडणूकीचा फंडा आणि अजेंडा भाजप आणि त्यांचे आमच्या समाजातील समाजद्रोही लोक राबवत आहेत.
लिंगायत मतदार दूतखुळा नाही हे सत्तेत असणाऱ्या लोकांनी लक्षात घ्यावे.आज आमच्या समाजातील विद्यार्थ्यांना न्याय नाही ; त्याच्यासाठी वेगळी संस्था नाही , कुठलाही लाभ नाही केवळ निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन धूळफेक करणाऱ्या आणि समाजात विषमता, मनुवाद पेरणाऱ्या भाजप आणि त्यांच्या ढोगी समाजप्रेमींना लिंगायत समाज जागा दाखवल्या शिवाय समतानायक महात्मा बसवण्णा, संत शिरोमणी मन्मथ माऊली,राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य माऊलीचे शरण स्तब्ध बसणार नाहीत.
चला तर मग लिंगायतानो आपल्याला वेड्यात काढणाऱ्या मनुवादी भाजपला जागा दाखवून देऊयात.
शरणु शरणार्थी ! जय बसवण्णा !! -निळकंठ ताकबीडकर
लिंगायत कार्यकर्ता