बौद्ध समाजाच्या हितासाठी माझी निवडणूकीतून माघार – दिपक कांबळे
दिलिप वाघमारे
देगलूर : समाजाचे मतविभाजन होवून इतर उमेदवारांना त्याचा फायदा मिळू नये याच प्रामाणिक हेतूने बौद्ध समाजाच्या हितासाठी देगलूर – बिलोली विधानसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी वापस घेतली असून दिवंगत खा.वसंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला नमन करून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत असल्याची भूमिका दीपक कांबळे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान मी गेल्या अडीच वर्षांपासून 90 देगलूर -बिलोली मतदारसंघात अहोरात्र फिरून ह्या मतदारसंघाच्या विकसित कामाचा आढावा, तसेच शेतकऱ्यांच्या समस्या, सुशिक्षित बेरोजगार युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझी उमेदवारी दाखल केली होती. मात्र गेल्या अनेक दशकापासून ह्या मतदारसंघात बौद्ध समाजाला उमेदवारी पासून वंचित ठेवले होते.
मात्र अखेर बौद्ध समाजाला काँग्रेस पक्षाने उमेदवारी देऊन न्याय दिला, त्यामुळे समाजाचा प्रथम विचार करून तसेच जाहिराबाद येथील खासदार व नांदेड लोकसभेचे प्रभारी, उमेदवार रविंद्र पाटील चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण सह निवृत्ती कांबळे यांनी काँग्रेस पक्षाला बळकट करून जातीवादी पक्षाला दूर ठेवण्यासाठी माझी उमेदवारी माघे घेण्यासाठी सांगितले.
त्या अनुषंगाने मी माझी उमेदवारी अर्ज माघे घेत असल्याची दिपक कांबळे यांनी सांगितले. यावेळी श्रीनिवास पाटील चव्हाण, उमेदवार निवृत्ती कांबळे, डॉ धुमाळे, वैका गौड, काँग्रेसचे बस्वराज पाटील, पांडू पाटील,शेख हबीब सर,कैलास कांबळे, जयपाल कांबळे, यासह काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.