ताज्या बातम्यानांदेडनायगांव

लाल वाळूची विनापरवाना वाहतूक करणारा हायवा महसूल पथकाने पकडला

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : लाल वाळूची विना पावती ओरलोड वाळू वाहतुक करणारा हायवा महसूल पथकाने सोमवारी सकाळी ११.३० च्या दरम्यान पकडला. पकडलेला हायवा पोलीस बंदोबस्तात तहसील कार्यालयासमोर उभे केले असुन या टिप्पर वर दंडात्मक कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.

शासनाने जनतेला ६०० रूपये ब्रास वाळू मिळावे म्हणून प्रयत्न करीत आहे पण बिलोली येथील महसूल अधिका-यांच्या जोरावर डेपो च्या नावाखाली चक्क वाळूचा काळाबाजार सुरू आहे. बिलोली तालुक्यातील वाजंरा नदीतून दररोज कित्येक हायवा विना पावती वाळू घेऊन जात आहेत. बिलोली तालुक्यात विना पावती व ओरलोड वाळू घेऊन के. ए. 39, ए. 2236 या क्रमांकाचा हायवा नरसीकडे सोमवारी सकाळी ११.३० च्या दरम्यानयेत असल्याची माहीती नरसी येथील मंडळधिकारी कावळे यांना मिळाली. कावळे हे हायवावर वर लक्ष ठेवून होते.

हायवा नरसी चौकात येताच थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर हायवा भरधाव वेगात नरसी चौकातून लातुर कडे निघाला. यावेळी कावळे यांनी पळ काढलेल्या हायवाचा पाठलाग करून चौकापासून दोन किलोमीटर अंतरावर कांडाळा पाटीजवळ अडविला. चालकाकडे वाळू वाहतूक परवाण्याची विचारणा केली असता पावती मिळून आली नाही. त्यामुळे मंडळधिकारी कावळे व तलाठी कांबळे बामणीकर यांनी रामतीर्थ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलीस कर्मचारी व पोलीस वाहन बोलून घेऊन सदर हायवा सोमवारी २.३० वाजता नायगाव तहसील कार्यालयात नेवून लावला.

अवैध वाळू वाहतूक आणि मर्यादेपेक्षा जास्त वाळू असल्या प्रकरणी पंचनामा करण्यात आला. कुठलाही वाहतूक परवाना नसताना हायवामध्ये आठ ब्रास वाळू असल्याचे आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या हायवावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker