शंकरनगर येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूल मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा
मोरे मनोहर
किनाळा :- शंकरनगर तालुका बिलोली येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूलच्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डी.पी.पांडेय हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कळमनुरी प्रकल्प कार्यालयाचे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री मुंगल एस.ए.आणी
आनंदा माने हे होते यावेळी उपस्थित मान्यवर मंडळींच्या शुभहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले या कार्यक्रमाच्या आरंभी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डि पी पांडे मार्गदर्शनपर भाषणामध्ये भारतीय राज्यघटनेतील व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय होणं आवश्यक आहे. तसेच जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगीकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान केला पाहिजे.
धर्मस्वातंत्र आणि समानतेचा अधिकार तसेच संविधान आपल्याला काही कर्तव्याची जाणीव करून देते देशाचे रक्षण करणे, राष्ट्रीय एकता राखणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे अभिमानाची बाब म्हणजे आपले संविधान जगातील सर्वात मोठे संविधान आहे असे अनमोल विचार मांडले.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सविधानावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तोडे उर्मिला यांनी केले तर आभार अजय रोकडे यांनी मानले यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.