सैनिक हो तुमच्यासाठी या अविरत कार्यक्रमासाठी संयोजक विजय जोशी यांचा सत्कार
भारतीय संविधान प्रत देऊन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व संपादक शंतनू डोईफोडे यांच्या हस्ते सन्मान - लक्ष्मणराव भवरे यांचा उपक्रम
New Bharat Times नेटवर्क
नांदेड :- भारतीय संविधान दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारतीय संविधान प्रत देऊन सैनिक हो तुमच्यासाठी हा सांस्कृतिक कार्यक्रम अविरतपणे घेणारे संयोजक विजय जोशी यांचा नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व दै.प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.जेष्ठ पत्रकार लक्ष्मणराव भवरे यांच्यावतिने हा उपक्रम राबविण्यात आला.
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यासाठी सैनिक हो तुमच्यासाठी… या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गत १६ वर्षांपासून अविरतपणे योगदान देतांनाच याच कार्यक्रमात भारतीय संविधान गौरव दिनाचेही औचित्य साधून भारतीय संविधान प्रास्ताविका सामूहिक वाचन करण्याचे बहुमोल कार्य कर्तव्यतत्परतेने या कार्यक्रमाचे संयोजक तथा,सुप्रसिद्ध गायक, मराठी पञकार परिषदेचे माजी कोषाध्यक्ष व महाराष्ट्र शासनाच्या पत्रकार अधिस्वीकृती समितीचे लातूर विभागीय अध्यक्ष विजयजी जोशी हे दरवर्षीच निष्ठापूर्वक व निस्वार्थपणे करित असतात.
त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून नांदेडच्या डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित सैनिक हो तुमच्यासाठी या दिनांक २६ नोव्हेंबर रोजी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमावेळी भारतीय संविधान दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारतीय संविधान प्रत भेट देऊन त्यांचा नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, दै.प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला.
मराठी पत्रकार परिषदेचे लातूर विभागीय संघटक व तालुका होमगार्ड समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे, नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे माजी जिल्हा सरचिटणीस नरेश दंडवते, जेष्ठ पत्रकार अनुराग पोवळे, महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक कर्मचारी संघटनेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख तथा, जिल्हाध्यक्ष गणेश अंबेकर, लक्ष्मणराव मा.भवरे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय संविधान व भारतीय संविधान प्रास्ताविका प्रत भेटींचा स्वखर्चातून उपक्रम राबवित भारतीय संविधान जागृती, प्रचार व प्रसारासाठी कार्यरत असलेले मराठी पञकार परिषद मुंबई संलग्न, नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष व राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे यांच्यावतिने हा उपक्रमातून सन्मान करण्यात आला.