शंकरनगर येथे मा जिजाऊ जन्मोत्सव साजरा

मोरे मनोहर
किनाळा :- शंकरनगर तालुका बिलोली येथे दरवर्षीप्रमाणे याही उच्चवर्षी येथील जिजामाता चौकात दि.12 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता मा जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मा जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सकाळी ठीक दहा वाजता रामतीर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नरवाडे यांच्या शुभहस्त े राजे छत्रपती शिवाजी महाराज व मा जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी नायगाव मार्केट कमिटीचे संचालक संतोष पाटील रामतीर्थकर, शिवसेना तालुकाप्रमुख बाबाराव पाटील रोकडे, ग्रामपंचायतीचे उपसरपंच मुरलीधर पाटील देगलुरे, चेअरमन सदाशिवराव पाटील डाकोरे, संतोष पाटील भक्तापुरे, संतोष पाटील, देगलूरे, हनमंत पाटील वाडेकर, जगदीश पाटील वाडेकर, ज्ञानेश्वर पाटील तोडे, दत्ता पाटील, लक्ष्मण पाटील देगलुरे, रामतीर्थ पोलीस स्टेशनचे जमादार शिंदे, बेळीकर यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.
जिजाऊ जन्मोत्सवा निमित्ताने खिचडी वाटप करण्यात आली हा जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवयुवक मित्र मंडळाचे राजेश रोकडे, विजय पुयड, वैजनाथ रोकडे, साईनाथ देगलूरे, अनिकेत रोकडे,शिवम मोरे, प्रथमेश वाडेकर, ओमकार पिसाळे, साईनाथ जोमेगावे,शिवम जोमेगावे, बालाजी देगलूरे, बाबुराव वनाळे, धनराज रोकडे, शिवकुमार रोकडे,सोमेश वाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास शंकरनगर येथील सर्व व्यापारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बिड जिल्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर कार्यक्रमाची सांगता जय जिजाऊ वंदना घेऊन करण्यात आली.