मिनकीच्या पिडीत कुटूंबाला खतगावकरांनी केली अर्थिक मदत
अंकुशकुमार देगावकर
बिलोली : गरीबी आणि शिक्षणाच्या बाजारीकरणाला बळी पडलेल्या बिलोली तालुक्यातील मिनकी येथील दुहेरी आत्महत्या पीडित पैलवार कुटुंबाला आज राज्याचे माजी मंत्री तथा मा.खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांनी भेट देऊन सांत्वन करत ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
शिक्षणासाठी गाव सोडून लेकरांना पन्नास- शंभर किलोमीटर दूर अंतरावर शिकायला ठेवले. सणासुदीच्या निमित्ताने मुलं घरी आली. मुलांनी शिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी केली. अंगावर नवीन कपडे असावे अशा मुलांनी वडिलांकडे आग्रह केला, परंतु आर्थिक हतलब असलेल्या बापाला मुलाच्या अत्यावश्यक व अगदी किरकोळ असलेल्या मागण्या देखील पूर्ण करता आले नाहीत. दहावीत शिकणाऱ्या ओमकार याने ही बाब मनाला लावून घेतली. आणि सकाळी शेतात जाऊन त्याने गळफास घेतला. थोड्यावेळाने शेतात गेलेल्या राजेंद्र पैलवार या त्याच्या वडिलांनी शेतात आपला मुलगा झाडाला लटकला आहे हे लक्षात येताच त्याला खाली उतरून पश्चातापाच्या व एकूणच आर्थिक तंगीला कंटाळून त्यानेही पाठोपाठ गळफास घेतला.
ही दुर्दैवी घटना समजताच मा. खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांनी या पीडित कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली आणि आगामी काळात मयत ओंमकार यांच्या भावंडांच्या घरकुलसाठी आणि शिक्षणासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे, बाळासाहेब पाटील खतगावकर, सभापती रवी पाटील खतगावकर, माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे, उपसभापती आनंदराव बिराजदार गुरुजी, इंद्रजित तुडमे, पत्रकार गोविंद मुंडकर, अंबादास शिनगारे, हनमंतराव पाटील बामणीकर, संतोष पाटील पुयड, चंद्रकांत देवारे, मारोती पाटील दगडे,क्षशंकर पाटील खतगावकर, माधव वाघमारे, गोविंद पाटील खतगावकर, शिवाजी अंगावर, शिवकांत मठवाले,विश्वनाथ पाटील बिराजदार, चंद्रकांत रेड्डी, मारोती आऊलवार,क्षमारोती सावळे, अमीर शेख, संगम बरदे, तिरुपती शिरलेवार, शिवाजी गायकवाड, गंगाधर इबिदार, हणमंत पाटील तोंडे, आत्महत्याग्रस्त कुटुंबियातील पत्नी सुनीता राजेंद्र पैलवार, आई राजाबाई पैलवार, बंधू हनमंत पैलवार, मुले किरण आणि श्रीनिवास उपस्थीत होते.