दोन लाचखोर पोलीस अधिकारी ACB च्या जाळ्यात
New Bharat Times नेटवर्क
बिलोली :- कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे व पोलीस उप निरीक्षक नारायण शिंदे या दोन लाचखोर अधिकाऱ्यांना चक्क पोलीस ठाण्यातच लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून. ज्या कोठडीत गुन्हेगारांना ठेवण्यात येत होते त्याच कोठडीत यांना रहावे लागल्याने काळाने सुड उगवला असल्याची जोरदार चर्चा होत आहे. नागरगोजे व शिंदे यांच्या भ्रष्ट कारभाराला त्या भागातील जनता मोठ्या प्रमाणात वैतागली होती. मात्र या दोन लाचखोरामुळे खाकीवर काळा धब्बा लागला आहे.
येथील पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांना १७ हजार रूपयांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ही कारवाई नांदेड येथील पथकाने गुरूवारी दुपारी करण्यात आली. या लाख प्रकरणात अन्य कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचीही चर्चा होत असून या सापळ्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
नदिड परिक्षेत्रात विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्हाच नव्हे तर परिक्षेत्रातील अवैध धंद्यांचा बिमोड करण्याचा विडा उचलला आहे. या धडक कारवाईस जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार भक्कमपणे साथ देत आहेत. परंतू झारीतील काही शुक्राचार्य या दोन अधिकाऱ्यांच्या कारवाईस गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.
कुंडलवाडी येथे खाकीला डाग लावण्याची घटना गुरूवारी दुपारी घडली आहे. किरकोळ कारवाईचा बडेजाव करणारे कुंडलवाडी ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे व पोलिस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांना एका तक्रारदाराकडून १७ हजारांची लाच घेतांना पकडण्यात आल्याची माहिती आहे. सदर कारवाई लातूर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली असून तक्रारदार रेतीवाला असल्याची चर्चा होत आहे.
महसूल विभागापेक्षा पोलीसच रेती वाहतूक करणाऱ्याची प्रचंड पिळवणूक करत असून. रेतीचा व्यवसाय करणाऱ्यांना अगोदर महसूल विभागालाच हप्ते द्यावे लागत होते पण आता जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण हप्ता द्यावा लागत असल्याने रेतीचे दर सर्वसामान्य नागरिकांच्या अवाक्याच्या बाहेर जात असल्याची ओरड होत आहे.