ताज्या बातम्यानांदेडबिलोली

अवैध दारू वाहतुकीवर कुंडलवाडी पोलिसांची कारवाई ; ७६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

कुंडलवाडी :- कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुंडलवाडी ते पिंपळगाव जाणाऱ्या रस्त्यावर अवैध दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे व इतर सहकाऱ्यांनी ६ हजार ७२० रुपयांची दारू व ७० हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा ७६ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई २८ जानेवारी रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. कुंडलवाडी ते पिंपळगाव जाणाऱ्या रस्त्यावर दि.२८ जानेवारी रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास अवैध दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती कुंडलवाडी पोलिसांना मिळाली.

यावरून कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोहेकाँ शंकर चव्हाण, पोहेकाँ अरुणा श्रीवास्तव व रवि देशमुख यांनी पिंपळगाव रस्त्यावर मोटरसायकल क्र.एम एच २६ सी एस ०३९८ या क्रमांकाच्या मोटरसायकल वरून अवैध दारू वाहतूक करीत असताना राजशेखर गोपाल गौड निम्माला यास पकडले.

असून त्याच्याकडून ६ हजार ७२०, रुपये किमतीची देशी दारू भिंगरी संत्राचे ९६ बॉटल व ७०-हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण ७६ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी राजशेखर गोपाल गौड निम्मला याच्याविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुरनं ९/२०२५ कलम ६५ ई दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ शंकर चव्हाण हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker