मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित ; मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा
New Bharat Times नेटवर्क
अंतरवली-सरटी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दि. 25 जानेवारी पासून अंतरवली सराटी येथे अमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांनी गुरुवारी दि. 30 जानेवारी रोजी उपोषण स्थगित केले. सरकारने जाणीवपूर्वक जरांगे यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करुन मराठा बांधवांच्या भावनाशी तर खेळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. जरांगे यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषणानंतर उपचारासाठी जालना, छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयात दाखल केले आहे. यापुढील आंदोलन थेट मुंबईत करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मागील 15 वर्षांपासून रस्त्यावरील लढाई लढत आहेत. त्यांचा लढा हा गरजवंत मराठ्यासाठी असतांना शासन वारंवार दिशाभूल करत असल्याने त्यांनी दि. 25 जानेवारी पासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली होती. परंतु या उपोषणाकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याने दि. 30 जानेवारी रोजी जरांगे यांनी उपोषण स्थगित केले. वेळी खासदार बजरंग सोनवने, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळुके, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बंन्सल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री भुसारे, सिव्हिल सर्जन डाँ. राजेंद्र पाटील, तहसीलदार विजय चव्हाण आदि उपस्थित होते.
ठिकाणी बोलतांना मनोज जरांगे यांनी सांगितले की, आरक्षण लढा चालू आहे शासनाने शिंदे समितीचे काम चालु करावे, कुणबी नोंदी साठी कक्ष स्थापन करावे राज्यातील नोंदी शोधून काढाव्या, वंशावळ, मोडी लिपी, अभास्यक नेमनुक यांचे नेमनुक करावी त्यांना मानधन द्या, तीर्थक्षेत्र मधील नोंदी, सातारा, बॉम्बे, हैदराबाद गॅजेट मधील नोंदी लागु करावी, राज्यात दाखल सरसकट गुन्हे वापस घ्यावे, गृह मंत्रालय यांनी लक्ष द्यावे, ईडब्ल्यूएस मधील प्रवेश न काढता
उच्च शिक्षणाचा लाभ द्यावा, मराठा आरक्षण मध्ये ज्यांचे बळी गेले यांना शासकीय नौकरी, पैसे द्यावे, सगे सोयरे कायद्याची अमलबजावणी करावी असे जरांगे यांनी सांगितले.
सगे सोयरे कायद्याची अमलबजावणी व मागण्या मंजूर झाल्या नाहीतर मुंबईला मोर्चा नेणार, मुंबईला जाण्यासाठी नियोजन करणार , या मध्ये आमच्यावर हल्ला झाला तर आमदार, मंत्री यांना सोडणार नाही आंदोलन करू, आता माघार नाही, हे उपोषण, आंदोलन स्थगित करतो, शक्यतो या पुढे उपोषण करणार नाही मुख्यमंत्री फडणवीस हे आमच्या सोबत गद्दारी करतात का पाहयाचे आहे, आमच्या मागणी पुर्ण करा, अमंलबजावणी करा परत समाजाची बैठक बोलवणार मुंबईला जाण्याची घोषणा करणार आम्ही अमलबजावणी केल्याशिवाय परत येणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस गद्दारी करणार नाही अशी अपेक्षा मनोज जरांगे यांनी व्यक्त केली.