युनायटेड पद्मशाली संघटनेच्या वतीने मार्कण्डेय मंदिराला इनव्हर्टर भेट
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : अखिल भारत युनाइटेड पद्मशाली समाज संघटना चे उपाध्यक्ष दानशूर व्यक्तीमत्व, समाज भुषण, प्रसिध्द उद्योजक श्री गोपालसेठ किशनसेठ गोरंट्याल यांच्या कडून श्री मार्कण्डेय ऋषींच्या जयंती निम्मित नायगांव येथील मार्कंडेय मंदीर ला इन्व्हर्टर आणि बॅटरी मार्कंडेय मंदिराला भेट देण्यात आली आहे.
नायगाव येथील मार्कण्डेय मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गोपाल शेठ गोरंट्याल आले होते. त्यावेळी त्यांनी मंदिराला इन्व्हर्टर आणि बॅटरी घेण्यासाठी २१ हजार रुपये दिले होते. यासाठी नागेश पुठ्ठा यांनी पुढाकार घेवून दिलेल्या रक्कमेतून मार्कण्डेय जयंतीच्या एक दिवस अगोदर शुक्रवारी इन्व्हर्टर आणि बॅटरी घेवून दिली आहे. यावेळी पद्मशाली समाजातील जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत मंदिराला भेट देण्यात आली.
यावेळी उपस्थित नायगांव समाजाचे ज्येष्ठ श्री शंकर मामा गोटलावार, बाबुराव मामा रामदिनवार, रामदास मामा वंगरवार, विठ्ठल मामा गोटलावार, किशन मामा कोकुलवार, चंद्रकांत मामा कोकुलवार, गणपतराव दुय्येवार मामा, महाराष्ट्र युनाइटेड पद्मशाली समाज संघटना चे उपाध्यक्ष श्री प्रभाकर जी लखपत्रेवार, मराठवाडा युनाइटेड पद्मशाली समाज संघटना चे युवक उपाध्यक्ष श्री नागेश जी पुठ्ठा जालनेकर.
पद्मशाली युनाइटेड समाज संघटना चे जिल्हा कार्याध्यक्ष श्री राजेश सेठ ताटेवार, प्रसिध्द व्यापारी श्री प्रहलाद वंगरवार, लक्ष्मणराव चन्नावार, पिंटू अण्णा मध्यमवार, प्रकाश लखपत्रेवार, निलेश बिरेवार, साईनाथ चन्नावार, गोपीनाथ मुंढे आंबटवार, बालाजीराव वंगरवार, हणमंतराव आंबटवार, बालराज चलमेवार, चंद्रकांत जी लखपत्रेवार, गंगाधर गोनेवार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.