बिलोली तालुका पद्मशाली समाज संघटनेची कार्यकारिणी जाहीर
कुंडलवाडी :- अखिल भारत पदमशाली संघम, हैद्राबाद, संलग्नित मराठवाडा पद्मशाली महासभा नांदेड अंतर्गत बिलोली तालुका पदमशाली समाज संघटनेची कार्यकारणी दि.३० जानेवारी रोजी कुंडलवाडी येथील श्री.विठ्ठल-साई मंदिरात झालेल्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आली आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गंगाधर पोशट्टी सब्बनवार हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून अखिल भारत पदमशाली संघम हैदराबादचे गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकरवार, उपाध्यक्ष प्रल्हाद सुरकुटवार, लक्ष्मीकांत गोणे, डॉ. मारोतराव क्यातमवार, व्यंकटेश जिंदम, सतीश राखेवार, अशोक श्रीमनवार, डॉ.गोविंदराव इपकलवार, गोविंद कोकुलवार, कविता गड्डम, भारत गड्डेवार, शिवाजी अन्नमवार, धनंजय गुम्मलवार, संग्राम निलपत्रेवार, नागनाथ गड्डम आदीजन यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते श्री मार्कंडेय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बिलोली तालुका पदमशाली संघटनेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात युवक अध्यक्षपदी नरेंद्र जिठ्ठावार, प्रौढ अध्यक्षपदी गंगाधर बिंगेवार तर महिला अध्यक्षपदी डॉ.अश्विनी सब्बनवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच संघटनेतील विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी पदमशाली समाज संघटनेचे प्रल्हाद सुरकुटलावार, श्रीधर सुंकरवार यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंढरीनाथ गंगुलवार, गंगाधर बिंगेवार, डॉ.प्रशांत सब्बनवार, कविता गड्डम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री बाबळीकर यांनी केले.
यावेळी तालुक्यातील पिंपळगाव, चिरली, खपराळा, बेळकोणी, सावळी, चिंचाळा, सगरोळी, बोळेगाव, कार्लाफाटा, तळणी, अर्जापुर, लघुळ, बडुर, बावलगाव आदी गावांतील पदमशाली समाज उपस्थित होते. तालुका कार्यकारिणीतील नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.