पत्रकार जयवर्धन भोसीकर धम्मसारथी पुरस्काराने सन्मानित
New Bharat Times नेटवर्क
नांदेड :- इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार जयवर्धन भोसीकर यांना लोकजनजागृती बहुदेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने धम्मसारथी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शहरातील पृथ्वी लॉन्स मंगल कार्यालयात दिनांक 2 फेब्रुवारी रोजी धम्मसारथी गौरव पुरस्कार व बौद्ध वधू वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन विजयकुमार सितळे यांनी केले होते. या कार्यक्रमास भदंत पंय्याबोधी महाथेरो, प्रशांत भाऊ ननावरे, डॉ.संगीता घुगे, डॉ.करुणाताई जमदाडे, सोनू शंखपाळ, रामकुमार सोनवणे, अशोक कापशीकर, सुभाष काटकांबळे, डीपी गायकवाड, अशोक हटकर, रवी पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार जयवर्धन भोसीकर यांना पत्रकारिता क्षेत्रातून बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार यासह विविध धम्म कार्यात सहभाग याकरिता धम्मसारथी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. भोसीकर यांना यापूर्वी आंबेडकरी चळवळीतील तुफानातले दिवे यासह विविध पुरस्कार मिळाले आहेत.
मेन स्ट्रीम मीडिया मधे त्यांनी कामाचा अनुभव, राजकीय व सर्व विषयावर ते भाष्य करत असतात त्यांनी अनेक डिबेट शो मधे आपली चमक दाखवली आहे, आंबेडकरी मीडिया साठी त्यांनी पर राज्यात जावून अनेक बातम्या केले आहेत. त्यांच्या योगदाना बद्दल त्यांना धम्मसारथी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.