क्राईमगावाकडच्या बातम्यालोहा

जोमेगाव येथे खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघा जणा विरुद्ध गुन्हा दाखल…

बालासाहेब शिंदे

मारतळा :- लोहा तालुक्यातील मौजे जोमेगाव येथे फिर्यादीस जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथा बुक्यानी व काठीने मारहाण करून गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीघा विरोधात उस्माननगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 20.03.2025 रोजी 12.30 वा चे सुमारास मौ.जोमेगाव ता.लोहा जि.नांदेड येथे, यातील आरोपी नामे 1.प्रल्हाद शेषेराव शिंदे, 2.परमेश्वर प्रल्हाद शिंदे, 3.रामेश्वर प्रल्हाद शिंदे सर्व रा. जोमेगाव ता.लोहा जि.नांदेड यांनी संगणमत करून फिर्यादीस जुन्या भांडणाचे कारणावरून शिवीगाळ करून लाथा बुक्यानी व काठीने मारहाण केले व गंभीर जखमी करून खुन करण्याचा प्रयत्न केला.

व जीवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी देवानंद जयसिंगराव गाडे, वय 27 वर्षे, व्यवसाय शेती रा.जोमेगाव ता.लोहा जि.नांदेड यांचे फिर्यादीवरुन पोस्टे उस्माननगर गुरनं 51/2025 कलम 109 (1), 118 (1), 115(2), 352, 351 (2), (3).3(5) बीएनएस-2023 कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन पुढील तपास वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुर्यवंशी, हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker