आयुष्यावर बोलतांनाच आयुष्य संपले : महाविद्यालयीन तरुणीची चटका लावणारी एक्झिट

New Bharat Times नेटवर्क
परांडा : मानवी जीवन किती क्षणभंगुर असते याचा प्रत्यय अनेकांनी आखोदेखा आला असून. परंडा येथील एक महाविद्यालयीन तरुणी मनोगत व्यक्त करतांनाच जागेवर कोसळली आणि तिच्या जीवनाचा अध्याय संपला. आयुष्यावर बोलतांनाच आयुष्य संपल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
महाविद्यालयतील निरोप समारंभाच्या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना जागेवरच कोसळल्याने भविष्यांचे स्वप्न रंगविणाऱ्या तरुणीने जगाचा निरोप घेतला. ही दुदैवी घटना शुक्रवारी दि. ४ एप्रिल रोजी रा. गे शिंदे महाविद्यालयाच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात घडली. महाविद्यालयातील वर्षा खरात हि विद्यार्थीनी विज्ञान शाखेत पदवीच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होती. शेवटच्या वर्षातील विद्यार्थांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते.
या कार्यक्रमात वर्षा मनमोकळेपणाने मनोगत व्यक्त करतांना आयुष्यावर बोलत बोलत असतानाच ती अचानक कोसळली यातच तिचा चटका लावणारा मृत्यू झाला सारेच हळहळले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर आयुष्यांचे चित्र रंगवित असताना भविष्याचे मनोहरी स्वप्न पाहत असताना कार्यक्रमात खळखळून हसणाऱ्या वर्षाने अचानक जगाचा निरोप घेतला. अत्यंत हदयद्रावक घटनेने अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. जीवन किती क्षणभंगूर आहे. या दुदैवी घटनेने पुन्हा अधोरेखित केले.