खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाबद्दल राहूल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस अदिसह अनेक मान्यवरांकडून श्रध्दांजली

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी विविध समाजमाध्यमातून श्रद्धांजली अर्पण करत आहेत. यात काँग्रेसचे राहूल गांधी, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, खा.सुप्रिया सुळे, अजित पवार व आ. रोहित पवार यांनीही एक्स या समाज माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राहूल गांधी:
वरिष्ठ कांग्रेस नेता, नांदेड़ लोकसभा सांसद श्री वसंतराव चव्हाण जी के निधन का समाचार अत्यंत दुखद है।
उन्हें भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करते हुए शोकाकुल परिजनों को, गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूं।
ज़मीन से जुड़े हुए लोकप्रिय नेता श्री चव्हाण आजीवन कांग्रेस की विचारधारा का समर्थन और विस्तार करते रहे।
उनका देहांत कांग्रेस परिवार के लिए एक अपूरणीय क्षति है।
मल्लिकार्जुन खरगे
नांदेड, खासदार श्री वसंतराव चव्हाण यांच्या निधनाबद्दल माझ्या मनःपूर्वक शोक. ग्रामपंचायत सदस्य म्हणून तळागाळातून राजकारणाला सुरुवात करून निवडून आलेल्या विविध पदांवर जनतेची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ नेत्याने शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसच्या विचारसरणीचे रक्षण केले. आमचे विचार आणि प्रार्थना त्यांचे कुटुंब, मित्र आणि अनुयायांसोबत आहेत.
खा.शरद पवार:
नांदेडच्या जनतेशी थेट संपर्क ठेवणारे विनम्र आणि अनुभवी नेतृत्व आज हरपले. काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांची दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. राजकारण आणि सहकार क्षेत्रात त्यांचे काम लक्ष वेधणारे आहे. जनकल्याणासाठी त्यांनी केलेला राजकीय प्रवास हा लक्षणीय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांचे असलेले जुने संबंध सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहावेदना व्यक्त करून वसंत चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
जयंत पाटील:
नांदेडचे काँगेसचे खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनाची बातमी अतिशय वेदनादायी आहे. तब्बल २४ वर्ष सरपंच, एक वेळेस विधान परिषद सदस्य, दोन वेळेस विधानसभा आमदार ते आता खासदार अशी त्यांची समृद्ध राजकीय कारकीर्द होती. नजीकच्या काळात काँग्रेसला नांदेड भागात नवसंजीवनी देण्याचे काम त्यांनी केले. त्यांची ही कारकीर्द कायम स्मरणात राहील.
देवेंद्र फडणवीस:
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सरपंच ते आमदार आणि नंतर खासदार म्हणून ते निवडून आले. सहकार क्षेत्रात सुद्धा त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने तळागाळातून पुढे आलेले नेतृत्व हरपले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि आप्तस्वकीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शान्ति .
अजित पवार:
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानं जनमानसातील कृतिशील नेतृत्व अशी ओळख असणारा कार्यशील लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेला आहे. चव्हाण कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांकरतो
अर्पण करतो.
सुप्रिया सुळे:
संसदेतील माझे सहकारी व नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. ग्रामपंचायत ते संसद अशी त्यांची प्रदिर्घ कारकीर्द होती. तळागाळातील जनतेशी त्यांची नाळ जोडलेली होती. त्यांच्या निधनामुळे चव्हाण कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
रोहित पवार:
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. चव्हाण कुटुंबियांवर कोसळलेल्या या दुःखात मी सहभागी आहे.