ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी नगरपरिषद निवडणूक पुर्वी भाजपला झटका ; मंडळ अध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी, बुथ प्रमुख, कार्यकर्ते यांचा राजीनामा

◆ मंडळ अध्यक्ष हणमलू ईरलावार व युवा मंडळ अध्यक्ष रवि हारे, रामा गवते यांच्यासह पदाधिकारी, बुथ प्रमुख, कार्यकर्ते यांचा राजीनामा ◆शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली

कुंडलवाडी :- कुंडलवाडी नगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी तीन दिवसांचा कालावधी असतानाच भाजपला झटका बसला असून शहर मंडळ अध्यक्ष हणमलू ईरलावार व युवा मंडळ अध्यक्ष रवि पाटील हारे, मंडळ सरचिटणीस रामा गवते, बूथ प्रमुख प्रकाश पालाकृतीवार, इब्राहिम पठाण, शेख अहमद, साईनाथ ठक्कुरवार यांनी दि.२८ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.विठ्ठलराव कुडमुलवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

कुंडलवाडी नगरपरिषदेची रणधुमाळी सध्या जोरात असून राजकीय प्रचार शिगेला पोहचला आहे. नगरपरिषद निवडणूकीसाठी दि.२ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. भारतीय जनता पक्षाने नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची व नगरसेवक पदाच्या तिकीट वाटपात निष्ठावंतांना डावलून नवख्या उमेदवारांना संधी दिली. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यात यामुळे तीव्र संताप व नाराजी पसरली. त्यामुळे शहरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश करीत आहेत. भाजप मंडळ अध्यक्ष युवा मोर्चा अध्यक्ष व भाजपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या पक्षप्रवेशामुळे नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत झाला आहे.

यावेळी माजी नगरसेवक पंढरी पुपलवार, लक्ष्मण भंडारे, सयाराम नामतेष, चेन्नारेड्डी गोदलवार, काशिनाथ नरावाड, नरेश सब्बनवार, सायारेड्डी पुपलवार, बंडूसेठ मुनगीलवार, विलास दिवशीकर, मोहम्मद बागवान, बाशिद शेख, व्यंकटेश नावाथे, महम्मद अफजल, सुरेश राचोटी, दत्तू हमंद,करण समेटवार, वहाब शेख, श्रीनिवास मंडगे, अशोक पाटील खुळगे, बालाजी ईरलावार, मारुती कोटलवार, समदानी बागवान, लक्ष्मण जालावार, हणमलू तडकासाट, गिरीश मुनगिलवार, साईनाथ जक्कावार, साईनाथ येवतीवाड, यादव तोटावार मारुती मुपडे आदी जण यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker