ताज्या बातम्यानांदेडबिलोली

३७ अंश डिग्री तापमानात जिल्ह्यातील शाळा पूर्णवेळ भरविण्याचा शिक्षण विभागाचा अट्टहास

◆ विद्यार्थ्यांना उष्माघात झाल्यास शिक्षण विभाग जबाबदार राहणार ◆ शाळा सकाळ सत्रात कधी भरणार ?

New Bharat Times नेटवर्क

कुंडलवाडी :- मार्च महिना सुरू झाला असून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाची तीव्रता वाढत असून आज दिनांक 4-मार्च रोजी 37 अंश डिग्री तापमानाची जिल्ह्यात नोंद झाली असून या तापमानात शाळा पूर्णवेळ भरविण्याचा जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा हट्ट अस का असा प्रश्न पालक वर्गातून उपस्थित होत असून विद्यार्थ्यांना उष्माघात झाल्यास शिक्षण विभाग जबाबदार राहणार असल्याची प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत असून शाळा सकाळ सत्रात कधी भरणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उन्हाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांकडून दरवर्षी मार्च महिना सुरू झाला की, शिक्षण विभाग शाळा सकाळ सत्रात भरविण्याचा निर्णय घेतात.पण यावर्षी मार्च महिना सुरू होऊन चार दिवस उलटले तसेच वाढती उन्हाची तीव्रता लक्षात घेता शाळा सकाळ सत्रात भरविण्याचा निर्णय जि.प.शिक्षण विभागाने घेतला नाही.

उन्हाचा तडाखा विचारात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोकादायक आहे, अनेक गावांत पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने मुलांना पिण्याचे पुरेसे पाणी उपलब्ध नाही. काही शाळांत पंखे नसल्याने विद्यार्थी उकाड्याने हैराण होत आहेत. पारा चाळिशीच्या जवळ गेला आहे. त्यामुळे शाळा आणि विद्यार्थी हे समीकरण उन्हामुळे गुंतागुंतीचे बनत आहे. जिल्हा परिषदेच्या व इतर माध्यमिक शाळांमध्ये इतर ठिकाणाहून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी येतात.

काही विद्यार्थी एक ते दोन किलोमीटर पायी किंवा सायकलवर देखील उन्हामध्ये प्रवास करत असतात. उन्हाचा पारा वाढत असून सकाळी ९ वाजेपासून उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात होत आहे. सर्व बाबीचा विचार करून शिक्षण विभागाने शाळा तात्काळ सकाळ सत्रात भरविण्याचे आदेश काढावेत अशी मागणी विद्यार्थी, पालक, शिक्षक वर्गातून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker