ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

RTE प्रवेशासाठी पालकांना दिलासा; ऑनलाईन अर्ज भरण्यास १८ मार्चपर्यंत मुदतवाढ

प्रकाश महिपाळे

नांदेड : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागांसाठीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आता मुदतवाढ देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १० मार्च होती, ती आता वाढवून १८ मार्च २०२६ करण्यात आली आहे.

​प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आज यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

  • नवी मुदत: बुधवार, १८ मार्च २०२६ पर्यंत.
  • संकेतस्थळ: https://student.maharashtara.gov.in/adm_portal
  • कोणाला लाभ मिळणार: आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये मोफत प्रवेशाची संधी.

​शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांच्या स्वाक्षरीने हे पत्र निर्गमित करण्यात आले आहे. तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे जे पालक अद्याप अर्ज करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. पालकांनी १८ मार्चपर्यंत दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज अचूकपणे सादर करावेत, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

​प्रवेश प्रक्रियेच्या सुधारित सूचना क्षेत्रीय स्तरावरील सर्व कार्यालयांनी पालकांपर्यंत पोहोचवाव्यात, असे निर्देशही या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker