ताज्या बातम्यानांदेडनायगांव

जनगणनेच्या पहील्या टप्याची आजपासून सुरुवात : खा.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ ‘स्व-गणने’चा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : सन २०११ नंतर प्रतीक्षेत असलेल्या राष्ट्रीय जनगणनेला आज, शुक्रवारपासून राज्यात सुरुवात झाली आहे. यावेळी प्रथमच ‘स्व-गणने’चा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. ही स्व गणना दि. १ ते १५ मे दरम्यान करावयाची आहे. नायगाव शहरात या स्व गणनेचा शुभारंभ खा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला.

राज्यात १ मेपासून राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत असून, यावेळी प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हा टप्पा ऐच्छिक असणार असून १ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावरून स्वतःच्या कुटुंबाची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांना स्व-गणना करता येणार आहे.

यासाठी https://se.census.gov.in हे स्वतंत्र पोर्टल १ मे ते १५ मे या कालावधीत कार्यरत राहील. शिवाय मोबाइल अँपच्या माध्यमातूनही स्व-गणना करता येणार आहे. घरातील कोणताही एक सदस्य सुमारे १५ ते २० मिनिटांत स्व-गणना प्रक्रिया पूर्ण करू शकतो. अर्ज सादर केल्यानंतर नोंदणीकृत मोबाइल क्रमांक किंवा ई-मेलवर स्व-गणना आयडी (SE-ID) प्राप्त होईल. स्व-गणना करताना कोणतेही कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही. या स्व-गणनेत एकूण ३३ प्रश्नांची विचारणा करण्यात येणार आहे.भारत

सरकारच्या महत्त्वपूर्ण उपक्रम असलेल्या जनगणना २०२७ अंतर्गत नगरपरिषद नायगाव शहरात स्वगणना (Self Enumeration) प्रक्रियेला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. नायगाव शहराचे प्रथम नागरीक मा. खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते स्वगणनेची सुरुवात करण्यात आली. वरील लिंक ला जाऊन स्वतःची माहिती भरू शकतात.स्वगणना

ही नागरिकांनी स्वतः अचूक माहिती नोंदविण्याची सुलभ व आधुनिक पद्धत असून, त्यामुळे जनगणना प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक व परिणामकारक होणार आहे. या प्रसंगी नगराध्यक्षा सौ. आर्चना संजय चव्हाण, मुख्याधिकारी सौ. गंधाली पवार, संजय चव्हाण,माणिक चव्हाण, श्रीधर कोलमवार, मुन्ना मंगरूळे, नगरसेवक बेळगे, टेक्निक्शन महेश कुलकर्णी व रामेश्वर बापुले नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker