गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

खंडगाव येथे वाढत्या लोडमुळे वीज वारंवार खंडित; नवीन डी.पी. बसवण्यासाठी महिलांसह ग्रामस्थांचे महावितरणला निवेदन

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : नायगाव तालुक्यातील खंडगाव (नवीन आबादी) येथे विजेचा वापर आणि लोड मोठ्या प्रमाणावर वाढल्याने जुना डी.पी. (ट्रान्सफॉर्मर) वारंवार बंद पडत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या समस्त ग्रामस्थ व महिलांनी महावितरण प्रशासनाकडे धाव घेत नवीन डी.पी. मंजूर करून बसवण्याची जोरदार मागणी केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी (२४ जुलै २०२६) महावितरणच्या नायगाव येथील उपकार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन देण्यात आले.

२५० कुटुंबांचा एकाच डी.पी.वर ताण
निवेदनात नमूद केल्यानुसार, खंडगाव (नवीन आबादी) भागात सध्या अवघा एकच डी.पी. कार्यरत असून त्यावर सुमारे २५० कुटुंबांचा वीजपुरवठा अवलंबून आहे. दिवसेंदिवस वाढलेल्या विजेच्या वापरामुळे या डी.पी.वर प्रचंड ताण येत आहे. परिणामी, दररोज वीजप्रवाह खंडित होऊन परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि ऑनलाईन शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. तसेच, गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजनाही विजेअभावी ठप्प होत असल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या व इशारा…
नवीन डी.पी.ची तातडीने सोय डी.पी.डी.सी. (DPDC) योजनेअंतर्गत खंडगाव येथे नवीन अतिरिक्त डी.पी. त्वरित मंजूर करून बसवण्यात यावा. सुरळीत वीजपुरवठा: वाढत्या लोडवर कायमस्वरूपी तोडगा काढून ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. आंदोलनाचा इशारा: प्रशासनाने या समस्येकडे त्वरित लक्ष न दिल्यास आणि लवकरात लवकर तोडगा न काढल्यास महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थ व महिलांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker