गावाकडच्या बातम्यानांदेडबिलोली

बैल चोरी प्रकरणातील जप्त रक्कम कुंडलवाडी पोलीसांकडून फिर्यीदीस परत

New Bharat Times नेटवर्क

कुंडलवाडी :- कुंडलवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बैल चोरीच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले २६ हजार रुपये शेतकऱ्याच्या शेतीच्या तातडीच्या गरजा लक्षात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कुंडलवाडी पोलिसांकडून फिर्यादीस दि.२५ जुलै रोजी तात्पुरते ताब्यात देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंडलवाडी येथील रमेश करपे यांनी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी दोन बैल चोरी केल्याची तक्रार कुंडलवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून गुन्हा क्रमांक १७६/२०२५ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस तपासादरम्यान आरोपींना अटक करण्यात आली. चौकशीत चोरीचे बैल विकल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपींकडून मिळालेले २६ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले होते.

दरम्यान, खरीप हंगामातील शेतीच्या कामांसाठी पैशांची अत्यंत गरज असल्याने तक्रारदार रमेश करपे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्याकडे विनंती अर्ज सादर केला. त्यानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १०६(३)अंतर्गत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तक्रारदाराकडून २६ हजारा रुपयांची रक्कम न्यायालयाने मागणी केल्यास तत्काळ न्यायालयात जमा करण्याचे तसेच तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे बंधपत्र घेण्यात आले. त्यानंतर सदर रक्कमेचा धनादेश देण्यात आला. धनादेश सुपुर्द करताना सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे,पोहेकाँ पी.आर.मेडेवार, रमेश करपे ,बाबुमियाँ शेख ,संजय करपे हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker