ताज्या बातम्यानांदेडबिलोली

नांदेड-देगलूर राज्यमहामार्गावर भीषण अपघात ट्रकची मोटरसायकलला धडक ; मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू तर आई गंभीर जखमी

मोरे मनोहर

किनाळा :- नांदेड-देगलूर राज्य महामार्गावर बिजूर जवळ ट्रकची मोटर सायकलला समोरा समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बिलोली तालुक्यातील थडी हिप्परगा येथील मोटर सायकलस्वार शेख अहेमद मोहम्मदसाब वय २३ वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर मोटार सायकल स्वाराचीआई हि गंभीर जखमी झाली हि घटना दि.२५ जुलै रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली असून या प्रकरणी सदरील ट्रक रामतीर्थ पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की थडी हिप्परगा तालुका बिलोली येथील शेख अहेमद मोहम्मदसाब हे आपल्या सहा दिवसांपूर्वी घेतलेल्या नवीन पल्सर गाडीवर आईला घेऊन गावाकडून नरसीकडे जात असताना बिजूर जवळ नांदेड कडून देगलूर कडे जाणाऱ्या RJ 06 GD0300 या भरधाव ट्रकची मोटरसायकलला समोरा समोर जोराची धडक होऊन झालेल्या भिषण अपघात मोटारसायकलस्वार शेख अहेमद मोहम्मदसाब यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मोटारसायकलस्वाराची आई अल्लावलीबी मोहम्मदसाब वय वर्षे ५० हिस मुका मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.

हा अपघात झाल्याची घटना समजताच रामतीर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन मयत शेख अहेमद व त्यांच्या आईस नायगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असता शेख अहेमद यांचे शवाविच्छेदन करून त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला तर जखमी असलेल्या आईवर येथील रुग्णालयात उपचार सुरू असुन शेख अहेमद यांचे सायंकाळी पाचच्या सुमारास थडी हिप्परगा येथे शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला.

शेख अहेमद हा गेल्या अनेक वर्षांपासून दुबई येथे कामाल होता तो काही दिवसापूर्वी लग्न करून घेण्यासाठी म्हणून गावाकडे आला होता मात्र त्यांच्या स्वप्नावर काळाने घाला घातल्याने त्यांच्या या अकाली अपघाती निधनाने गावभर शोककळा पसरली असून या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker