गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

मेळगाव येथे ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : तालुक्यातील मेळगाव येथे बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम २०२४ या योजनेंतर्गत ग्रामपंचायतची इमारत बांधण्यात आली. या इमारतीचे खा.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

आयोजित करण्यात आलेल्या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षपदी कुंटूरकर शुगरचे अध्यक्ष राजेश कुंटूर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुक्याचे गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, सहायक गट विकास अधिकारी प्रकाश जाधव, विस्तार अधिकारी महेश मुखेडकर, विस्तार अधिकारी गणेशराव टोनगे सरपंच सौ.महीपाळे भारतबाई आशोक आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.आनंदराव पा.शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी सुर्यकांत बोडंले यांनी मांडले. सूत्रसंचालन श्री.गो.रा परडे सर यांनी केले.

या कार्यक्रमास उपसरपंच सौ.गोदावरीबाई मारोतराव शिंदे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मी तुमच्या सेवेत नेहमीच तयार आहे – खा.चव्हाण…
ग्रामपंचायत इमारत लोकार्पण झाल्यानंतर मनोगत व्यक्त करतांना खा.रवींद्र चव्हाण यांनी ग्रामपंचायती अधिक बळकटी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे आलेल्या निधीचा विकास कामासाठी वापर करा अशा सुचना करुन. मी नायगाव तालुक्याचा भुमिपुत्र असल्याने नायगाव तालुक्याच्या विकासासाठी मी कटीबद्ध आहे. त्यामुळे कुठल्याही कामासाठी माझ्याशी थेट संपर्क करा, मी तुमच्या सेवेत नेहमीच तयार आहे असे यावेळी आवर्जून सांगितले.

कुंटूरकरांनी घेतली पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती…
कार्यक्रमाला गटविकास अधिकाऱ्यासह पंचायत समितीचे अनेक अधिकारी व ग्रामसेवक उपस्थित असतांना मागच्या काही महिण्यापासून नायगाव पंचायत समितीमध्ये सुरु असलेल्या कारभाराची चिरफाड करतांना राजेश कुंटूरकरांनी चाललेल्या खेळाचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी गटविकास अधिकाऱ्यासह सर्वांचेच चेहरे पाहण्यासारखे झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker