नायगाव तालुका हादरला : नापिकी आणि कर्जाला कंटाळून २२ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या

New Bharat Times नेटवर्क
नायगाव : कर्ज व नापिकीला कंटाळून एका तरुणाने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नायगाव तालुक्यातील सावरखेड येथे दि. 15 मे रोजी घडली. तरुणाच्या आत्महत्येमुळे कुंटंबावर शोककळा पसरली आहे.
नायगाव तालुक्यातील सावरखेड येथील हनमंत आनंदा ढगे, (२२ वर्ष ) हा दि. 15 मे रोजी सकाळी शेताकडे शौचालय जातो आणि येताना जनावरांना चारा घेवून येतो म्हणून गेला. मात्र अर्ध्या तासानंतर हनमंत ढगे यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची खबर मिळाली. घरातील नातेवाईकांनी तत्काळ शेताकडे धाव घेतली पण तोपर्यंत हनमंत गतप्राण झाला होता.
हनमंत ढगे यांच्या प्रेत नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदनांनतर शोकाकूल वातावरण शुक्रवारी दुपारी सावरखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हनमंत ढगे यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. ऐन तारुण्यात मुलाने आत्महत्या केल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला तर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



