विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यस नायगाव पोलिसांनी केली अटक : आरोपीकडून लोखंडी गुप्ती जप्त

प्रकाश महिपाळे
नायगाव : बसस्थानक परिसरात विनापरवाना लोखंडी गुप्ती बाळगून फिरणाऱ्या संदीप गायकवाड, वय 29, रा. महात्मा फुले कॉलनी याला नायगाव पोलिसांनी अटक केली. गुप्त माहितीवरून सपोनि शंकर बरकुलवाड यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. 500 रु. किमतीची गुप्ती जप्त.
नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत नायगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका आरोपीच्या ताब्यातून विनापरवाना बाळगलेली लोखंडी गुप्ती म्हणजेच हत्यार जप्त करण्यात आले आहे.
नायगाव नायगाव शहरात पेट्रोलिंग दरम्यान साईनाथ सांगवीकर व बाबुराव चव्हाणकुर यांना गोपनीय माहिती मिळाली की संदीप गायकवाड हा नायगाव बसस्थानक परिसरातील पानटपरी समोर विनापरवाना शस्त्र बाळगून फिरत आहे. माहिती मिळताच सपोनि शंकर बरकुलवाड, , साईनाथ सांगवीकर, बाबुराव चव्हाणकुर, गजानन हेरपुडकर, संजयकुमार चव्हाणकुर यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत 500 रुपये किमतीची लोखंडी गुप्ती मिळून आली. त्याला तत्काळ जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली.



