गावाकडच्या बातम्यानांदेडमुदखेड

नारायणराव वाघमारे महाविद्यालयात ‘करिअर कट्टा संसद’ शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न

राहुल कोलते

आखाडा बाळापूर : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चालविल्या जाणाऱ्या ‘करिअर कट्टा’ उपक्रमाअंतर्गत, नारायणराव वाघमारे महाविद्यालय, आखाडा बाळापूर येथे ‘जागतिक युवा कौशल्य दिना’चे औचित्य साधून ‘करिअर कट्टा संसद’ शपथविधी सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश्वर कीर्तनकार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड येथील सायन्स कॉलेजचे डॉ. प्रशांत सुतकर उपस्थित होते. या सोहळ्यात डॉ. प्रशांत सुतकर यांनी करिअर कट्टा संसदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना व सदस्यांना पदाची शपथ दिली. यामध्ये सर्वप्रथम संसदेच्या नवनिर्वाचित ‘मुख्यमंत्री’ कु. शुभांगी दत्तराव मुधोळ हिला शपथ देण्यात आली, त्यानंतर इतर सर्व संसद सदस्यांनी शपथ ग्रहण केली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य डॉ. राजेश्वर कीर्तनकार यांनी सध्याच्या काळात ‘युवकांपुढील आव्हाने आणि त्यावरील उपाय’ यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तर प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत सुतकर यांनी ‘युवकांमध्ये कौशल्य विकास रुजवण्यासाठी करिअर कट्टा संसद कशी महत्त्वाची व गरजेची आहे’ याविषयी सखोल माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे समन्वयक तथा हिंगोली जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. सुधाकर गाढे यांनी मांडले, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिलीप घुगे यांनी केले. या सोहळ्यास प्रा. डॉ. दादासाहेब कदम आणि माजी विद्यार्थी प्रमोद जाधव यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी कु. योगेश्वरी खातिकमारे हिने उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker