ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगाव मतदारसंघात एसआयआरचे ९९.८२ टक्के काम पूर्ण३२ हजार ७९३ मतदारांचे गणना प्रपत्र न मिळाल्याने नावे वगळणार ; १७ ऑगस्टपर्यंत संधी…

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेत नायगाव विधानसभा मतदारसंघाने ९९.८२ टक्के काम पूर्ण केले आहे. घरभेटीदरम्यान आढळून न आलेले, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले, मृत, अन्यत्र नोंदणी झालेले किंवा दुबार नोंद असलेल्या ३२ हजार ७९३ मतदारांचे (१०.६६ टक्के) गणना प्रपत्र प्राप्त झाले नसल्याने त्यांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नायगाव विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ७ हजार ५३३ मतदार आहेत. त्यापैकी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत २ लाख ७४ हजार १८६ मतदारांचे (८९.१६ टक्के) गणना प्रपत्र स्वाक्षरीसह प्राप्त झाले आहेत. तर ३२ हजार ७९३ मतदारांचे प्रपत्र अद्याप जमा झालेले नाहीत. असे तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी सांगितले की, गणना प्रपत्र जमा करण्याची अंतिम मुदत १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत आहे. त्यामुळे अद्याप प्रपत्र जमा न केलेल्या मतदारांनी तातडीने संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याशी संपर्क साधून प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहनही तहसीलदारांनी केले आहे.

तालुकानिहाय आकडेवारीनुसार नायगाव तालुक्यात १ लाख ३४ हजार ९१७, उमरी तालुक्यात ७३ हजार ६२१, तर धर्माबाद तालुक्यात ६५ हजार ६४८ मतदारांचे गणना प्रपत्र प्राप्त झाले आहेत. मतदारसंघातील एकूण ३ लाख ७ हजार ५३३ मतदारांपैकी ३ लाख ६ हजार ९७९ मतदारांबाबतची कार्यवाही पूर्ण झाली असून, केवळ ५५४ मतदारांची प्रक्रिया (०.१८ टक्के) बाकी आहे.

गणना प्रपत्र प्राप्त न झालेल्या मतदारांची यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच ही यादी जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या मतदारांच्या नावाबाबत प्रपत्र प्राप्त झालेले नाही, त्यांच्या वास्तव्याची माहिती संबंधित नागरिक किंवा मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी प्रशासनाला द्यावी. त्यानंतर प्रत्यक्ष पडताळणी करून १७ ऑगस्टपर्यंत गणना प्रपत्र भरून घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मतदार यादीतील अचूकता राखण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू असून, एकही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये यासाठी शेवटच्या टप्प्यात विशेष प्रयत्न केले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker