ताज्या बातम्यानांदेडमुदखेड

पुरोगामी पत्रकार संघाच्या मुदखेड तालुका अध्यक्षपदी उत्तम हनुमंते ; उपाध्यक्षपदी अब्दुल रजाक यांची बिनविरोध निवड

राहुल कोलते

मुदखेड : मुदखेड येथील विश्रामगृहामध्ये पुरोगामी पत्रकार संघाची विशेष बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत मुदखेड तालुका पुरोगामी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली असून, तालुका अध्यक्षपदी ‘दैनिक एकमत’चे पत्रकार उत्तम हनुमंते तर उपाध्यक्षपदी अब्दुल रजाक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

या बैठकीला राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ (भारत) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकर सिंह ठाकूर, पुरोगामी शिक्षक हक्क समितीचे राज्य अध्यक्ष प्रभूजी सावंत, कला, क्रीडा व विश्व समिती अध्यक्ष प्रा. अविनाश नाईक, पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष मारोती शिकारे, मराठवाडा कार्याध्यक्ष प्रमोद गजभारे, नांदेड जिल्हाध्यक्ष रविंद्र सोनकांबळे कल्हाळीकर, पोलीस मित्र समितीचे मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार उजेडकर, नांदेड जिल्हाध्यक्ष अशोक प्रघाणे आणि ‘दै. वीरशिरोमणी’चे संपादक शुभम ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
तालुका अध्यक्ष: उत्तम हनुमंते
उपाध्यक्ष: अब्दुल रजाक
सचिव: साहेबराव गागलवाड
सहसचिव: राजेश महाशेट्टे
संघटक: धम्मदाता कांबळे
सहसंघटक: राहुल कोलते
सल्लागार: ॲड. गोविंद गुजरवार

याप्रसंगी कार्यकारिणीच्या सदस्यपदी जयराम वने, सिद्धार्थ चौदंते, साहेबराव हौसरे, देविदास शिंदे, राहुल आप्पा चौदंते आणि प्रकाश गवारे यांची निवड करण्यात आली असून सर्वांनी या प्रक्रियेत मोलाचे सहकार्य केले.

निवड जाहीर होताच उपस्थित सदस्यांनी आणि पत्रकारांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!