धनगर ST आरक्षणाच्या लढ्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी नांदेडमध्ये आज राज्यस्तरीय बैठक

New Bharat Times नेटवर्क
नांदेड : धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी नांदेड येथे राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. अशी माहिती ओबीसी नेते बबन वाघमारे यांनी दिली आहे.
ही बैठक रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजता, नांदेड येथील विजय नगर हनुमान मंदिर, मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. धनगर ST आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, या मागणीसाठी समाजाच्या विविध संघटना आणि कार्यकर्त्यांकडून सातत्याने आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीत आरक्षणाच्या लढ्याची आगामी रणनीती, आंदोलनाची दिशा आणि समाजाची एकजूट याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे.
या बैठकीस धनगर समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक तसेच समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल धनगर समाज, जिल्हा नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे. बैठकीस मल्हाररायोध्दा दीपकभाऊ बोंढाडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.असेही बबन वाघमारे यांनी कळविले आहे.



