डोणगाव येथे खांबावरील तार तुटून पडल्याने विजेचा शॉक लागून मधुकर कानोले यांचा मृत्यू

मोरे मनोहर
किनाळा :- शेतातील विजेच्या खांबावरील तार तुटून शेतात पडल्याने शेताकडे गेलेल्या डोणगाव खुर्द तालुका बिलोली येथील मधुकर गंगाधर पाटील कानोले वय 40 वर्ष यांचा शेतात पडलेल्या विजेच्या तारावर पाय पडून विजेचा शॉक लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना ऐन पोळ्याच्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास घडली असून कानोले यांचा सायंकाळी पाचच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अधिक माहिती अशी की डोनगाव खुर्द तालुका बिलोली येथील मधुकर गंगाधर पाटील कानोले हे नेहमीप्रमाणे सकाळी उठून गावापासून जवळच असलेल्या शेताकडे गेले परंतु ते नेहमीप्रमाणे घराकडे परत न आल्याने घरातील अनेकांनी कानवले यांच्या फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा संपर्कही होऊ न शकल्याने शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना आमच्या जरा शेताकडे जाऊन कानोले यांना घराकडे येण्यासाठी सांगा असे सांगितले असता शेता शेजारील शेतकरी कानोले यांच्या शेताकडे जाऊन पाहिले असता कानोले यांचा विजेच्या खांबावरील तार शेतात तुटून पडलेला त्यांच्या पायात अडकल्याने त्यांना विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.
ही घटना गावात समजतात अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ विजेचा प्रवाह बंद करून कानोले यांना नायगाव येथील शासकीय रुग्णालयात नेले असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत्यू झाल्याचे घोषित करून त्यांचे शवाविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असता मधुकर कानोले यांचा शोकाकुल वातावरणात दोन गाव खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
वीज मंडळांनी खांबावरील तुटून शेतात पडलेली तार वेळेवर पाहून ती जर तात्काळ जोडली असती तर आज ही एखाद्या कुटुंबावर वेळ आली नसती मात्र ऐन पोळ्याच्या दिवशी ही घटना घडल्याने गावभर शोककळा पसरली असून वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे एका नाहक गरीब व होतकरू शेतकऱ्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने गावभर पोळ्याच्या सणावर दुःखाचे सावट होते.
कानोले यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार असून कानवले यांच्या अकाली निधनाबद्दल गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.



