नायगांव
-
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा: ४ सप्टेंबरला नायगाव तालुका बंदचे सकल मराठा समाजाचे आवाहन
प्रकाश महिपाळे नायगाव :- मराठा समाजाच्या प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला जाहीर…
Read More » -
१५ हजारांची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई एसीबीच्या जाळ्यात
New Bharat Times नेटवर्क मुखेड : शेतजमिनीचा मोजणी अहवाल न्यायालयात पाठविण्यासाठी तब्बल १५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना मुखेड…
Read More » -
रेतीने भरलेल्या हायवाची कारला जोरदार धडक ; महिलेचा जागीच मृत्यू, दोघे जखमी
अंकुशकुमार देगावकर नायगाव : तालुक्यात अवैध रेती वाहतूक होत नसल्याचा दावा करणाऱ्या महसूल व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर कृष्णूर येथे घडलेल्या…
Read More » -
महसूल व पोलिसांच्या सहकार्याने मुरूम माफियांचा सुळसुळाट ; हप्तेखोरीमुळे रात्रीच्या अंधारात खुलेआम मुरूमाची चोरी
अंकुशकुमार देगांवकर नायगाव : नायगाव तालुक्यातील नैसर्गिक सौंदर्याने नटलेले डोंगर आणि हिरवेगार माळरान सध्या मुरूम माफियांच्या अमानुष उत्खननामुळे संकटात सापडले…
Read More » -
पत्रकारावर हल्ला व जीवे मारण्याची धमकी ; कुंटूर येथे आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी
अंकुशकुमार देगावकर नायगाव :- हॉटेल राजवाडा धाब्यावरील हाणामारीची बातमी प्रसिद्ध केल्याचा तीव्र राग मनात धरून ‘दैनिक देशोन्नती’चे कुंटूर प्रतिनिधी अनिल…
Read More » -
पंधराव्या वित्त आयोगाची लाखो रुपयाची देयके अडकली; प्रशासक राज, ऑनलाइन अडथळे आणि न्यायालयीन स्थगितीचा फटका
सय्यद जाफर नायगाव:- नायगांव तालुक्यातील फेब्रुवारी २०२६ मध्ये मुदत संपलेल्या तब्बल ६८ ग्रामपंचायतींच्या कारभारासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत असून, गावाच्या विकासासाठी…
Read More » -
नायगांव येथील चिद्रावारच्या तिन कापड दुकानांवर जीएसटी विभागाची चार दिवस चौकशी
सय्यद जाफर नायगांव :- शहरातील चिद्रावारच्या तिन कापड दुकानांवर जीएसटी विभागाच्या पथकाकडून सलग चार दिवस चौकशी करण्यात आल्याने शहरातील व्यापारी वर्गात तसेच नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये चार दिवस नेमकी कोणत्या बाबींची तपासणी केली, या चौकशीत काय आढळून आले आणि त्यानंतर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती समोर न आल्याने प्रसिद्धी माध्यमांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नायगांव शहरातील जुना मोंढा, मुख्य बाजारपेठ मधील व नांदेड -हैद्राबाद राज्यमहामा र्गावरील अशा चिद्रावारच्या तिन कापड दुकानांमध्येजीएसटी विभागाच्या पथकाने सलग चार दिवस विविध कागदपत्रे, व्यवहाराशी संबंधित नोंदी तसेच इतर आर्थिक बाबींची तपासणी केल्याची माहिती आहे. या कालावधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानातील व्यवहार आणि उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या चौकशीमागील नेमके कारण काय होते, याबाबत विभागाकडून अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.जीएसटी विभागाकडून एखाद्या व्यापारी प्रतिष्ठानाची अनेक दिवस तपासणी केली जाते, तेव्हा त्यामागे करप्रणालीशी संबंधित काही बाबींची पडताळणी, आर्थिक व्यवहारांची तपासणी अथवा नोंदींचे परीक्षण असू शकते. मात्र, चिद्रावारच्या प्रकरणात नेमकी कोणती बाब तपासण्यात आल. हे अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. चार दिवस चाललेल्या चौकशीनंतर संबंधित प्रतिष्ठानावर कोणतीही कारवाई झाली आहे का? नोटीस बजावण्यात आली आहे का? दंड अथवा कराची मागणी करण्यात आली आहे का? की चौकशी केवळ कागदपत्रांच्या पडताळणीपुरती मर्यादित आहे? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.या संपूर्ण प्रकरणाबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक प्रसिद्धी माध्यमांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर जीएसटी विभागाकडून कारवाईचा तपशील किंवा चौकशीचा निष्कर्ष जाहीर होणे अपेक्षित असताना त्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, केवळ जीएसटी विभागाने चौकशी केली म्हणून संबंधित व्यापाऱ्यांकडून करचोरी अथवा कोणताही गैरप्रकार झाला आहे, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. चौकशीचा अंतिम निष्कर्ष आणि विभागाची अधिकृत कारवाई समोर आल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते.नायगांव शहरातील तिन मोठ्या कापड दुकानांवर सलग चार दिवस जीएसटी विभागाची चौकशी झाल्याने शहरातील व्यापारी वर्गाचेही या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. जीएसटीशी संबंधित नियमांचे पालन, बिलिंग, कर भरणा आणि व्यापारी व्यवहारातील पारदर्शकता या बाबींवर…
Read More » -
१९८४ पासून प्रलंबित नरंगल येथील प्लॉट वाटपासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक
नायगाव : मौजे नरंगल, ता. नायगाव, जि. नांदेड येथे सन १९८४ पासून प्रलंबित असलेले प्लॉट वाटप तातडीने करण्यात यावे, अशी…
Read More » -
अवैध दारू वाहतुकीवर नायगाव पोलिसांचा दणका : एक लाखाच्या दारुसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रभाकर लखपत्रेवार नायगाव :- तालुक्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, परराज्यातील विदेशी…
Read More » -
रातोळीत नायगाव पोलीसांची धाड : 1.24 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त ; एकास अटक
प्रभाकर लखपत्रेवार नायगाव : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यासाठी साठवणूक करणाऱ्यांविरोधात नायगाव पोलिसांनी धडक कारवाई…
Read More »